Brata Virus Alert For Android | केवळ एका चुकीने रिकामे होईल बँक खाते, Android यूजर्सला घाबरवण्यासाठी आला BRATA Virus
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Brata Virus Alert For Android | गेल्या काही काळापासून, BRATA नावाचा बँकिंग फ्रॉड ट्रोजन अँड्रॉइड यूजरना लक्ष्य करत आहे आणि त्यांचा फोन डेटा आणि बँक तपशील चोरत आहे. सायबर सिक्युरिटी फर्म क्लीफी (Cleafy) च्या नवीन सुरक्षा संशोधन अहवालानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरपासून या मालवेअरचा एक नवीन व्हेरिएंट सर्क्युलेट होत आहे. तो तुमचा स्मार्टफोन फॅक्टरी रिसेट करून सर्व डेटा पुसून टाकते. (Brata Virus Alert For Android)
हा व्हायरस कसा काम करतो?
जेव्हा पहिल्यांदा हा व्हायरस आढळला तेव्हा असे दिसून आले की हा व्हायरस वेबसाइट, Google Play आणि Android डिव्हाईसवर थर्ड पार्टी अॅप्सद्वारे काम करतो.
नंतर असे दिसून आले की हॅकर्स व्हॉट्सअॅपसारख्या मेसेजिंग अॅपवर संदेश पाठवून लोकांनाही फसवत आहेत. अनेकदा यूजर्सना अँटी-स्पॅम अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठविली गेली आहे जी प्रत्यक्षात स्पॅम आहे.
अँटी व्हायरस देखील पकडू शकत नाही
BRATA मालवेअर 2019 मध्ये आढळला होता आणि आता पुन्हा एकदा त्याद्वारे हल्ले सुरू झाले आहेत.
अँड्रॉइड स्मार्टफोन हे ओपन सोर्स आधारित आहेत.
यामध्ये लोक थर्ड पार्टी अॅप्स इन्स्टॉल करतात ज्याद्वारे हा मालवेअर तुमच्या फोनला टार्गेट करतो.
त्यानंतर हा सायबर फसवणूक करतो. सर्वात मोठी समस्या म्हणजे या मालवेअरचे हे नवीन व्हर्जन कसे कार्य करत आहे
आणि यूजरला फसवण्याचे हॅकर्सचे माध्यम काय आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही.
हा बँकिंग ट्रोजन, बँकिंग अलर्टच्या नावाने यूजरला फसवत आहे आणि अँटी व्हायरस प्लॅटफॉर्मला देखील टाळत आहे.
Web Title :- Brata Virus Alert For Android | brata virus alert for android phone users banking fraud trojan malware be safe
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, विलीनीकरणाबाबत मोठी माहिती आली समोर