15 वर्षीय मुलीने मोबाईल चोरांना घडवली अद्दल, मुलगी गंभीर जखमी

पोलिसनामा ऑनलाईन, चंदीगढ, दि. 2 सप्टेंबर – सॉप्ट टार्गेट म्हणून महिला आणि मुलीना घेरून त्यांचे दागिने आणि मोबाईल हिसकावले जातात. अशाच मोबाईल चोरांना एका 15 वर्षीय मुलीने चांगलीच अद्दल घडवली आहे. यात मुलगी जखमी झाले आहे. मात्र, तिने चोरांना न घाबरता सामना केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हि घटना पंजाबच्या जालंधर येथे घडली आहे.

कुसुम कुमारी असे या 15 वर्षीय धाडसी मुलीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुसुम कुमारी असं या धाडसी मुलीचे नाव असून ती रस्ताने जात होती. यावेळी दुचाकीवरून दोन चोरांनी तिचा मोबाईल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यावेळी कुसुमने न घाबरता चोरांना कडाडून विरोध केला. मोबाईल चोरट्यांनी तिच्या हातावर वार केले. तरीदेखील या मुलीने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. यात ती जखमी झाली पण नेटाने लढलीय.हा सर्व प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. तसेच सोशल मीडियावरही याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.

मोबाईल हिसकावणार्‍या चोराला कुसुमने विरोध केला. तसेच त्यांची दुचाकी पकडली, त्यावेळी एकजण खाली उतरून त्याने कुसुमला मारहाण केली. तिचे केस धरून तिच्यावर शस्त्राने वारही केले. मात्र, कुसुम मागे हटली नाही, तिने जखमी अवस्थेत पुन्हा चोरांचा पाठलाग करून मदतीसाठी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. कुसुमचा आवाज ऐकून काही लोक तिच्या मदतीसाठी धावले.

यावेळी लोक येत असल्याचे पाहून चोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यातील एकाला पकडण्यात यश आलं. कुसुमने आपला मोबाईलही परत मिळवला. तिच्या या हिमतीमुळे एका चोराला अटक केलीय.

अविनाश कुमार असे या अटक केलेल्या चोराचे नाव आहे. चोरट्यांशी लढताना कुसुमला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती एका हिंदी वेबसाईटने दिलीय.