संसदेत महिला खासदाराने घातला लो-कट ड्रेस, लोकांनी दिल्या बलात्काराच्या धमक्या

ब्राझील : वृत्तसंस्था – साधापणपणे संसदेत एखादी महिला आपण जेव्हा कल्पना करतो तेव्हा नक्कीच एक साडी घातलेल्या किंवा अंगभर कपडे घातलेल्या महिलेचे चित्र डोळ्यासमोर येते. परंतु एका महिला नेत्याने लो-कट ड्रेस घालून संसदेत आली. यामुळे तिच्यावर निशाणा साधण्यात आला. सदर महिला लो-कट ड्रेस घालून संसदेत आल्याने सोशल मीडियातून तिच्यावर टीका झाली. काही लोकांनी तर टीका करताना पातळी ओलांडत अक्षरश: बलात्कारापर्यंतच्या धमक्या दिल्या आहेत.

सदर प्रकरण हे ब्राझीलमधील आहे. ब्राझीलच्या खासदार ऍना पॉला असं त्यांचं नाव आहे. त्यांनी संसदेत घालून आलेल्या लो-कट ड्रेसमुळे या नव्या वादाला सुरुवात झाली. ऍना पॉला या 43 वर्षीय असून त्यांनी घातलेल्या कपड्यांमुळे त्यांच्यावर टीकांचा पाऊस पडला. सोशल मीडियावर लोकांनी त्यांना चक्क बलात्काराच्या धमक्या दिल्या आहेत.

ऍना पॉला या आधी महापौरदेखील होत्या. 50 हजार मतांनी विजय मिळवून ऍना पॉला जानेवारीमध्ये संटा कटरीनामधून संसदेची निवडणूक जिंकल्या आहेत. पण निवडणुकीनंतर ऍना पॉला जो ड्रेस घालून संसदेत आल्या त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. त्यामुळे सोशल मीडियावर भलताच वाद उफाळून आला. सोशल मीडियावर झालेल्या या वादावर ऍना पॉला यांनी प्रत्यूत्तरही दिल्याचं दिसून आलं.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “मी अनेकदा अशी घट्ट आणि लो-कट कपडे वापरते. मी जशी आहे तशी राहणार. या सगळ्या गोष्टींमध्ये न अडकता मी आनंदी राहणार आहे. माझ्या कपड्यांचा आणि कामाचा काहीही संबंध नाही. बरं इतकंच नाही तर, मला धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार” असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान ऍना पॉला या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. इतकेच नाही तर, सोशल मीडियावर त्यांचे हजारो चाहतेही आहेत. सोशल मीडियावर झालेल्या या वादासंबंधी त्यांनी इन्स्टाग्रामवरही लिहलं आहे.