Brazil Football Legend Pele Dies At 82 | महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन

पोलीसनामा ऑनलाईन : Brazil Football Legend Pele Dies At 82 | फुटबॉल विश्वातून एक धक्कादायक बातमी आली आहे. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागच्या बऱ्याच काळापासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup) दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मागच्या आठवड्यापासून त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली. त्यांच्या निधनानंतर फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. पेले यांची मुलगी नेसिमेंटोने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.

वडिलांकडून फुटबॉलचे धडे

पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला होता.पेले यांनी आपल्या वडिलांकडून फुटबॉलचे धडे गिरवले होते. त्यांच्या वडिलांच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे ते फ़ुटबॉल खेळू शकले नव्हते. मात्र त्यांनी आपलं स्वप्न मुलगा पेले यांना महान खेळाडू बनवून पूर्ण केलं. (Brazil Football Legend Pele Dies At 82)

पेले यांनी फुटबॉल विश्वात दोन दशके त्यांनी अधिराज्य गाजवलं.
ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाशिवाय ब्राझीलमधील क्लब सांतोसकडून ते खेळायचे.
1958 मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.
तसेच पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिकदेखील केली होती.
तसेच आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1366 सामन्यांमध्ये त्यांनी 1281 गोल केले.
त्यांची गोल सरासरी 0.94 इतकी होती. तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे ते एकमेव फुटबॉलपटू होते.
पेले यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Web Title :- Brazil Football Legend Pele Dies At 82 | Brazil Football legendary football player pele dies at the age of 82

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

Ajit Pawar | ‘मी बिलंदर शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही, पण…’ अजित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला