राष्ट्रपतींनी म्हणाले होते किरकोळ ‘फ्लू’, आता ‘हा’ अख्खा देशचं बनू शकतो ‘कोरोना’चा ‘हॉटस्पॉट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ब्राझीलमध्ये आता कोरोना विषाणूची झपाट्याने वाढ होत आहे. संक्रमित लोकांची संख्या, 54,043 झाली आहे, तर 3700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलची एकूण लोकसंख्या फक्त 21 कोटी आहे. एका वृत्तानुसार लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा देश कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनू शकतो. संक्रमित लोकांच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणा ठप्प होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

दरम्यान ब्राझीलच्या राष्ट्रपतींवर कोरोनाला गांभीर्याने न घेतल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रपती जॅर बाेलसाेनाराे यांनी कोरोनाला फ्लूसारखा किरकोळ आजार म्हटले होते. त्याचबरोबर ब्राझीलचे मॅनॉस शहर कोरोनापासून अधिक प्रभावित झाले आहे. यापूर्वी दररोज 20 ते 30 मृत्यू होत असत, तर आता कोरोनामुळे दररोज 100 हून अधिक मृत्यू होत आहेत.

दररोज शेकडोच्या संख्येत होणाऱ्या मृत्यूमुळे मॅनॉसचे महापौर व्हर्जिलियो नेटो यांनी कोरोनाचे, भयपट चित्रपटाचे एक दृश्य म्हणून वर्णन केले आहे. शहरात सामूहिक स्मशानभूमी तयार करण्यात आल्या आहेत, जेणेकरून मोठ्या संख्येने मृत लोकांना पुरता येईल. ब्राझीलच्या मॅनॉस शहरात मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. बरेच लोक त्यांच्या घरात मरण पावले आहेत आणि त्यांना वैद्यकीय सेवा मिळालेली नाही, अशी भीतीही महापौरांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात मृत्यूची संख्या अजून जास्त असू शकते.

मॅनॉस शहर ब्राझीलच्या अ‍ॅमेझॉन राज्यात आहे. कोरोना विषाणूमुळे येथे राहणाऱ्या आदिवासींनाही धोका आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 28 लाख 22 हजारांच्या पुढे गेली आहे. तर 1 लाख 97 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.