काय सांगता ! हो, तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागले चक्क रक्ताचे अश्रू, डॉक्टरही हैराण

ब्राझिल : वृत्त संस्था – ब्राझीलमध्ये एका 15 वर्षांच्या मुलीच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टरही हैराण झाले आहेत. ही तरुणी साओ पाओलात राहते. हीच वय 15 असून तिचं नाव डोरिस आहे.

12 सप्टेंबर रोजी या तरुणीला आजारी असल्यासारखं वाटलं. यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिच्या पोटात तीव्र वेदना होत असल्याचं तिनं सांगितलं. डॉक्टरांनी तिच्या किडनीत स्टोन तर नाहीत ना हे तपासून तिला औषध दिलं आणि घरी पाठवलं.

13 सप्टेबर रोजी सकाळी उठल्या उठल्याच तिच्या डोळ्यातून रक्त येत होतं. तिला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिला तपासलं परंतु डोळ्यातून रक्त येण्याचं कारण त्यांना समजलं नाही. त्यांनी पुन्हा तिला घरी पाठवलं.

डोरिसची आई जुलियाना टेक्सेरा मिरांडाने सांगितलं की, डॉक्टरांनी अनेक टेस्ट केल्या. मात्र डोरिसच्या आजाराबाबत माहिती मिळाली नाही. 14 सप्टेंबर रोजी आम्हाला घरी पाठवण्यात आलं. डोळ्यातून रक्त येण्याचं कारण काय असावं हे आम्हीही शोधण्याचा प्रयत्न केला.

नेत्ररोग तज्ज्ञ डॉ रफायेल एन्टोनिया बारबोसा डेल्सिन यांनी एक वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, डोळ्यातून रक्त येणं याला वैद्यकीय भाषेत हेमोलाक्रिया (Hemolacria) म्हणतात. ही समस्या जास्त गंभीर नाही. रुग्णाच्या शरीरात एखादी समस्या असेल तर असं होतं. अनेकदा उपचारांशिवाय देखील ही समस्या नीट होते.

अँटीबायोटीक्स आणि हार्मोनल रेमेडिजद्वारे यावर उपचार शक्य आहे. याचं कारण काय आहे किंवा कोणता आजार याला कारणीभूत आहे यावरून याचे उपचार केले जातात. डोरिसची अजून तपासणी सुरू आहे. तिला नेमका कोणता आजार आहे हे माहिती नाही. त्यामुळं तिच्या उपचाराबाबत काही सांगू शकत नाही असंही डेल्सिन यांनी सांगितलं.