धक्कादायक ! ‘या’ बहाद्दरानं चक्क 240 महिलांना बनवलं होतं ‘सेक्स स्लेव’, प्राण्यांशी देखील बनवले ‘संबंध’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्राझीलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका चर्चमध्ये युथ ग्रुप लीडर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने तब्बल 240 महिलांना वेश्या बनवून ठेवले होते. अनेक अनोळखी व्यक्ती आणि जनावरांसोबत देखील संबंध ठेवण्यासाठी त्याने मजबूर केले. याप्रकरणी पोलिसांनी 32 वर्षीय एका व्यक्तीला अटक केली आहे. रोना स्केल्ब असे आरोपीचेन नाव आहे. महिलांना सेक्स स्लेव बनवून तो ब्लॅकमेल करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनी असे या आरोपीचे नाव असू तो सेल्समध्ये काम करतो. तसेच चर्चमध्ये देखील व्हॉलिंटिअर म्हणून काम करतो. या आरोपीने चार वर्षात 11 राज्यातील अनेक महिलांचे शोषण केले आहे. आरोपीने सोशल मीडियावर अनेक प्रोफाईल बनवून ठेवले होते. त्याच्या मदतीनेच तो या महिलांच्या संपर्कात येत असे. एका महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

मुलींशी असा करत होता संपर्क
रोनीने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक बनावट प्रोफाईल्स बनवले होते. याद्वारे तो मुलींना आणि महिलांशी संपर्क साधत होता. महिला आणि मुलींशी संपर्क साधून त्यांना नग्न फोटो आणि व्हिडिओची मागणी करत होता. त्यासाठी त्याने दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. पैशांचे अमिष दाखवून त्याने अनेक महिला आणि मुलींचे फोटो आणि व्हिडिओ मागवले होते. हे सगळे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या हाती लागल्यानंतर त्याने महिलांना आणि मुलींना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तो देत होता.

तसेच याबदल्यात त्याने महिलांकडे आणि मुलींकडे आणखी व्हिडीओ आणि फोटोची मागणी करत होता. तसेच तो भेटण्यासाठी बोलवत होता. महिला आणि मुलींना बोलावून घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. यानंतर संबंधित महिला किंवा मुलीला एखाद्या पुरुषासोबत किंवा प्राण्यासोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ पाठवण्यास सांगत होता.

त्याने कित्येत महिला आणि मुलींसोबत सेक्स कॉन्ट्रॅक्टवर करुन त्यावर सही घेतली होती. त्यासाठी त्याने त्यांच्यावर बळजबरी केली होती. या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याने लिहले होते, महिलेसोबत तो काहीही करू शकतो. स्वत:ला खूष करण्यासाठी महिलेला मारहाण देखील करू शकतो, असे कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद करण्यात आले होते.

रोनीने अनेक मुलींना त्रास दिला आहे. रोनीला पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाला, मी काहीही चुकीचे केलेले नाही. माझी कोणतीही चूक नाही. कोणत्याही महिलेवर बलात्कार केला नाही, मी निर्दोष आहे.