निमोणेमध्ये वाढदिवस साजरा करणं चांगलच महागात पडलं, 30 जणांवर FIR

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यातील निमोणे येथे काल रात्री एकत्र येत वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तीस जणांवरती गुन्हा दाखल केला.

याबाबतीत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संकटकाळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत तोंडाला मास्क न वापरणे ,सोशल डिस्टन्स न राखता एकञ येत वाढदिवस साजरा केला गेला. या मध्ये निमोणे येथील संकेत काळे याचा तरुणांनी एकञ येत वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी 30 जणांवरती शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरी अशा प्रकारे कोणी शासकीय आदेशाचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करत असेल तर त्याविरोधात प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येइल असे पोलिस प्रशासनाकडुन सांगण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक देऊळकर करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like