Break The Chain | मुंबई लोकल सेवेबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची महत्वाची माहिती, म्हणाले…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात हळूहळू कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. ब्रेक द चेनच्या (Break the Chain) नियमाअंतर्गत अनलॉकच्या (Unlock) प्रक्रियेत मुंबई शहर आता (Mumbai) पहिल्या स्तरात आले आहे. मात्र अजूनही मुंबईत दररोज 500 ते 700 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या स्तरातील निर्बंध कायम राहणार असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी सांगितले आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन (Local train) सुरु करण्याबाबतही टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जाणार असल्याचेही चहल यांनी स्पष्ट केले आहे. break the chain unlock local train bmc commissioner iqbal singh chahal give some important information

आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) म्हणाले की, मुंबईतील लोकल सेवा (Local train) टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. त्यात आधी महिलांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचा विचार केला जाईल. त्यानंतर इतरांचा विचार केला जाईल. यामुळे लोकलमध्ये गर्दी होणार नाही. मात्र तत्पूर्वी मुंबई शहर दुसऱ्या टप्प्यात येण्यासाठी परिस्थितीत आणखी सुधारणा होण्याची गरज आहे. त्यानंतरच लोकल सेवेसंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

सध्या मुंबई पहिल्या स्तरात आली असली तरी येत्या 2 ते 3 आठवड्यात तिस-या लाटेची शक्यता आरोग्य मंत्रालयाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मुंबई पालिकेकडून आराखडा तयार केला जात आहे. म्हणूनच शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी सर्व निर्बंध शिथील करुन सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करणे धोकादायक ठरू शकतो, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हटलं. पालिकेकडून सावध पावलं उचलली जात आहेत. शहरातील रुग्णसंख्येत घट झाल्याने पुढच्या आठवड्यासाठी काही निर्बंध शिथील करण्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे काकाणी म्हणाले.

मुंबई पहिल्या स्तरात

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) आणखी घसरला असून आठवडाभरात पॉझिटिव्हिटी रेट 3.79 टक्के इतका आहे. ऑक्सिजनची सुविधा असलेले 75 टक्क्यांहून अधिक बेड रिकामे झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील निर्बंध शिथील होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात हा रेट 4.40 टक्के तर त्याआधीच्या आठवड्यात 5.25 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. आता 12 हजार 583 पैकी 9 हजार 626 ऑक्सिजन बेड (Oxygen Beds) रिकामी आहेत. म्हणजेच एकूण 2 हजार 967 ऑक्सिजन बेडवर रुग्ण (23.56 टक्के) आहेत.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : break the chain unlock local train bmc commissioner iqbal singh chahal give some important information

हे देखील वाचा

SBI | पैसे काढण्यासाठी सतत बँकेत जाता का? मग जाणून घ्या ‘हे’ नियम अन्यथा भरावी लागेल ‘ही’ फी

Sangli News । रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत 87 रुग्णांचा मृत्यू; प्रमुख डॉक्टरला अटक, सांगलीतील धक्कादायक प्रकार

Railway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसच्या 3378 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

अखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन्शन’ची कारवाई