पुणे : प्रमोशन इव्हेंटच्या सामानाची टोळक्याकडून तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

मोबाईल दुकानासमोर कंपनीच्या प्रमोशनच्या इव्हेंट साहित्याची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली. तसेच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करुन वहातूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या टोळक्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जंगली महाराज रोडवरील सिटी मोबाईल व केन्शा मोबाईल शॉपीसमोर शुक्रवारी (दि.२४) दुपारी अडीचच्या सुमारास घडला.
[amazon_link asins=’B019MQLUZG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c91c600e-a875-11e8-9a22-5f6842629d0e’]
याप्रकरणी सुहास निम्हन याचेसह 6 ते ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अभिजीत पोपटराव धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. जंगली महाराज रोडवरील सीटी मोबाईल आणि केन्शा मोबईल शॉपी येथे सॅमसंग मोबाईल कंपनीच्या प्रमोशनचा इव्हेंट होता. इव्हेंटसाठी लागणाऱ्या साहित्याची या ठिकाणी मांडणी करण्यात आली होती. यावेळी सुहास निम्हन आणि त्याचे ६ ते ७ साथिदार या ठिकाणी आले. त्यांनी या कार्यक्रमाचा त्रास होत असल्याचे सांगून इव्हेंटच्या सामानाची तोडफोड केली. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करुन परिसरात दहशत निर्माण केली. या टोळक्याने केलेल्या राड्यामुळे या ठिकाणच्या वाहतूकीला काहीवेळ अडथळा निर्माण झाला होता. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या-
हे शहर आपले असून स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे : आयुक्त हर्डीकर

Loading...
You might also like