Pune News : वानवडी, कोंढवा, हडपसर परिसरात घोडयांच्या शर्यतीवर बेटिंग घेणार्‍या तब्बल 21 जणांना अटक ! बडया बुकींचा समावेश तर 10 मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरातील रेसकोर्स येथे चालणार्‍या घोडयांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे बेटिंग घेणार्‍यांवर पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरातील वानवडी, कोंढवा आणि हडपसर परिसरात एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईमध्ये काही बडया बुकींना तसेच खेळायला येणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तब्बल 21 जणांना अटक करण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी पहाटेपर्यंत ही कारवाई चालू होती. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 10 मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, लॅन्डलाईन फोन आणि इतर ऐवज जप्त केला आहे.

विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी फिर्याद दिली असून मुख्य आरोपी शब्बीर मोहसीन खंबाटी (रा. पद्मव्हिला सोसायटी, वानवडी) याला अटक करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर मुंबईमधील रेसकोर्सवर कोरोना क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आल्याने तेथील शर्यती पुण्यात होत आहे. रेसकोर्समध्ये शासकीय परवाना घेतल्यानंतरच सर्व टॅक्स भरून बेटिंग घेणार्‍यांना परवाना दिला जातो. मात्र, काही जण टीव्हीवर शर्यती पाहून त्यावर ऑनलाइन बेटिंग घेत होते. घोडयांच्या शर्यतीवर मोठया प्रमाणावर बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हडपसर, कोंढवा आणि वानवडी परिसरात छापे टाकले. पोलिसांनी बेटिंग घेण्यासाठी वापरल्या जाणारे साहित्य तसेच मोबाईल असा एकुण 55 हजार 500 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. घोरपडी परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळील डोबरवाडी येथे मोकळया जागेमध्ये शुक्रवारी दुपारी बेकायदेशीरपणे बेटिंग घेण्यात येत होते. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 20 जणांना अटक केली. अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बेटिंग प्रकरणी शब्बीर मोहसीन खंबाटी (रा. पद्मव्हिला सोसायटी, वानवडी), तन्मय दत्तात्रय वाघमारे (29, रा. फ्लॅट नं. 205, अर्चना मेडोज, लेन नं. जी, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क), राकेश हणमंत कट्टमणी (रा. सर्व्हे नं. 66, ढोबरवाडी, घोरपडी गाव), गोपाळ गोविंद स्वामी (59, रा. 160 फिलीप चाळ), अविनाश दिलीप इंगळे (36), लडारस प्रभानंद हिरेकरू (47, रा. 66, ढोबरवाडी, घोरपडी गाव), नरेश शंकरदास मुलचंदानी (47, रा. शास्त्री अपार्टमेंट, कॉफी हाऊस जवळ, कॅम्प), खालीद सलीम मोहम्मद मेमन (72, रा. 717, भवानी पेठ, चुडामल तालीम जवळ, भदीया हॉटेलच्या शेजारी), मोहम्मद अब्दुल जाफर (76, रा. भंडारी बाग नारंगी मंजील, बोट क्लब रोड, बंडगार्डन), ताजमहोम्मद अहमद भगत (57, रा. एच. 19, महाराष्ट्र हौसिंग सोसा., येरवडा), कुमार गंगाराम चिकणे (55, रा. जावध वस्ती, भारत फोर्स कंपनी रोड, मुंढवा), विश्वास सावळाराम काठे (65, रा. 2015, लेन नं. 2, जय मल्हार नगर, सांगवी), प्रीतपाल रामकिशन गाढी (65, रा. इंद्रप्रभा, देहुरोड), रवी कुमार राजकुमार लांभ (30, रा. ढोबरवाडी), संतोष रघुनाथ चिट्टे (34, रा. बिबवेवाडी गावठाण, दत्त मंदिराजवळ), प्रकाश विठ्ठल कांबळे (66, रा. क्रीस्टल हाईट्स, ओमकार गार्डनचे मागे, कोंढवा), माहीन प्रभाकर हिरेकरू (49, रा. सदगुरू रेसिडेन्सी, बी.टी. कवडे रोड), शफी मोहम्मद शेख (रा. कौसरबाग, कोंढवा), मनोज वसंत पाल (40, रा. बी.टी. कवडे रोड, कृष्णानगर), रोहित प्रभु हिरेकरू (29, रा. घोरपडी गाव, ढोबरवाडी, वानवडी) आणि रविंद्र सोपान नेटके (31, रा. लेन नं. 5, जी, कोरेगाव पार्क, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

अशा प्रकारची कारवाई पुण्यात पहिल्यांदाच झाली असून या कारवाईमुळं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अनेकांची फोननंबर मिळाले आहेत. त्यानुसार पोलिस तपास करणार आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.