दिल्ली : बेकायदेशीर कॉलनीत राहणार्‍यांना मोदी सरकारनं दिली इनकम टॅक्समध्ये सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली सरकारने बेकायदेशीर कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांना इनकम टॅक्समध्ये मोठा दिलासा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी अधिकृत झालेल्या दिल्लीच्या बेकायदा कॉलनीमध्ये ज्यांनी जमीन किंवा घरे खरेदी केली त्यांना आयकरात सूट मिळणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

सरकार कडून असे म्हटले आहे की, यापूर्वी या कॉलन्या बेकायदेशीर होत्या. अशा परिस्थितीत मालमत्ता नोंदणीसाठी सरकारने ठरविलेल्या सर्कल रेटच्या तुलनेत काही लोकांनी कमी किंमतीत जमीन किंवा घर विकत घेतले आहे. अशा लोकांना इनकम टॅक्समध्ये सूट देण्यात येईल.