IPL 2020 च्या ‘टायटल’ स्पॉन्सरशीपच्या शर्यतीत Dream 11 ची ‘बाजी’, मोजली एवढी रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2020) टायटल स्पॉन्सरशीपच्या शर्यतीत देशातील मोठं नाव दाखल झालं आहे. टाटा सन्स यांनी टायटल स्पॉन्सरशीच्या शर्यतीत उडी घेतली असून त्यांचे पारडे जड असल्याचे मानले जात होते. टाटा सन्स व्यतिरिक्त बाजयू, रिलायन्स जिओ, पतांजली, Dream 11 आणि अनअकॅडमी यांनी टायटल स्पॉन्सरशीपसाठी रस दाखवला आहे. मात्र, आयपीएल 2020 च्या मोसमाच्या टायटल स्पॉन्सरशीपच्या शर्यतीत Dream 11 ने बाजी मारली आहे.

भारत-चीन सिमेवर वाढत्या तणातणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे Vivo ने यंदा संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपवरून माघार घेतली. Vivo India ने 2018 मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023 ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत.

Dream 11 नं 222 कोटींत हे स्पॉन्सरशीप नावावर केली असून अनअकॅडमीनं 210, टाटा सन्ननं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती. त्यामुळे आता 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान Dream 11 IPL 2020 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे. आयपीएल आयुक्त ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.