ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचे निधन, शरद पवारांनी वाहिली श्रध्दांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार थॉमस चंडी यांचे नुकतेच निधन झाले. 72 वर्षांच्या चंडी यांना पत्नी आणि तीन मुले असा परिवार होता. काही दिवसांपासून चंडी हे कॅन्सरवर उपचार घेत होते. मिळलेल्या माहितीनुसार रुग्णालयातच शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. चंडी हे कुट्टनाड विधानसभेचे आमदार होते.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
केरळमधील कुट्टनाड येथील राष्ट्रवादीचे आमचे आमदार थॉमस चंडी यांच्या निधनाबद्दल मला कळले तेव्हा मी फार दु: खी झालो यामुळे मला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपले जीवन अत्यंत प्रामाणिकपणाने जगले. त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो अशा शब्दात शरद पवार यांनी थॉमस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चंडी यांनी अवैध्य रित्या कब्जा केल्याच्या आरोपावरून त्यांना नोव्हेंबर 2017 मध्ये केरळच्या परिवहन मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चंडी हे कुवेत आणि सौदी मधील मोठे व्यापारी देखील होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/