‘महाराष्ट्र राजभवनाचं RSS शाखा किंवा BJP कार्यालय म्हणून नामकरण करावे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर आज (मंगळवार) निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी भेट घेतली.काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. या टीकेला काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी ट्विट करत कडवट टीका केली आहे. जगताप यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का ? असा प्रश्न विचारत टीका केली आहे.

दरम्यान, आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. गोंधळानंतर काही वेळासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर जगताप यांनी विधान परिषदेत कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.

जगतापांच्या ट्विटमुळे पडली वादाची ठिणगी

अभिनेत्री कंगना प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून कंगना आक्रमक झाली असून तिने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. त्यानंतर हा वाद कंगना विरुद्ध शिवसेना असा झाला. यात कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग महापालिकेने पाडल्यानंतर कंगनानं संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आमदार भाई जगताप यांनी तिला समज दिली होती.

कंगनाच्या कार्यालयाचा बेकायदा बांधलेला भाग महापालिकेनं गेल्या आठवड्यात पाडला. यावरुन संतापलेल्या कंगनानं या कारवाईचा फोटो शेअर करत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या ट्विटला आमदार भाई जगताप यांनी उत्तर दिलं.