पुण्यातील शिवाजीनगर कोर्टातील बेलीफ अडीच लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर न्यायालयातील एका बेलीफला अडीच लाख रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे. अडीच लाखामध्ये 30 हजार रूपयाच्या खर्‍या नोटा होत्या आणि इतर नोटा या डमी होत्या अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. हा अ‍ॅन्टी करप्शनचा सापळा यशस्वी झाल्यानंतर संपुर्ण वकिल वर्गामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

अ‍ॅन्टी करप्शनमधील सुत्रांच्या माहितीनुसार, मनोहर कांबळे असे लाच घेण्यार्‍या बेलीफचे नाव आहे. त्याने ऑर्डर करून देण्यासाठी ही लाच घेतली आहे म्हणजेच डेक्कन येथील एका जागेचा ताबा न देण्यासाठी लाचेची केली होती. लाचेची मागणी झाल्यानंतर संबंधित तक्रारदाराने पुण्यातील अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यालयात तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचुन ही कारवाई केली. ही कारवाई झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/