Breaking : अखेर संजय राठोडांचा राजीनामा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा मंजूर करणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोड यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री मंजूर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राठोडांच्या राजीनाम्यामुळं शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून राठोडांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात होती.

आज (रविवार) राठोड हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले होते. तेथेच त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान, सध्या मी राजीनामा देतो आहे पण चौकशी पुर्ण होऊ द्या, त्यामध्ये मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजूर करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा घेतला असून त्यावर ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन आठवडयापेक्षा जास्त दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.