पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू तर उत्तम स्वास्थ्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती (pandharpur-mla-bharat-bhalkes-health-critical) समोर आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि. 27) सकाळपासूनच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू असून, आमदार भालके यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

आमदार भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु त्यानंतर इतर आजार बळावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवले होते. पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत असल्याचे समजते.