Breaking ! पिंपरी-चिंचवड : पोलिस कर्मचारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापा टाकत 50 हजार रुपयांची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले आहे. काही वेळापूर्वी ही कारवाई झाली आहे.

सचिन जाधव असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे वाकड पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. दरम्यान यातील तक्रार याच्यावर 498 चा गुन्हा दाखल आहे. यात मदत करण्यासाठी लोकसेवक सचिन यांनी 75 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार या लाचेची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज तडजोडीअंती 50 हजार रुपयांची लाच घेताना जाधव यांना एसीबीने रंगेहात पकडला आहे.