home page top 1

राष्ट्रवादीला दिवसभरातील दुसरा मोठा झटका ! रामराजे नाईक निंबाळकर भाजप नव्हे तर ‘या’ पक्षात करणार प्रवेश

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन- सातारा जिल्ह्याच्या राजकारणात भाजप, शिवसेनेचे वारा वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय अखेर निश्चित केला आहे. फलटण येथील निवासस्थानी आज (गुरुवार) सायंकाळी झालेल्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला.

यावेळी रामराजे, संजीवराजे, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सदस्य दत्ता अनपट, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ यांच्यासह फलटण मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या  बैठकीत रामराजे आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

मागील अनेक दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु होत्या. अखेरीस आज त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रामराजे नाईक निंबाळकरांच्या पक्षांतरामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडल्याने अडचणीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक धक्का बसणार आहे.

Loading...
You might also like