शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा रविवारी (दि. 11) दाखल करण्यात आले आहे. उद्या सोमवारी (दि. 12) त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी शरद पवारांसोबत त्यांची पत्नी, मुलगी सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे आहेत.

शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास उद्भवल्याने ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यावर सोमवारी (दि. 12) शस्त्रक्रिया होणार आहे. यापूर्वी पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना अचानक मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी पित्ताशयातील खडा देखील काढला होता. ते त्यावेळी चार ते पाच दिवस रुग्णालयात होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याना काही दिवस घरीच विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्याच वेळी त्यांच्यावर काही दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा एक शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानुसार पवार हे रुग्णालयात दाखल झाले आहेत.