विद्यापीठांच्या परीक्षा ‘या’ महिन्यात होणार, UGC कडून नियमावली जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला असून यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार येत्या सप्टेंबरच्या अखेरीस परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला पत्र पाठविले असून विद्यापीठांनना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थाही परीक्षा घेऊ शकणार आहेत. मात्र, या परीक्षा युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. युजीसीही लवकरच परीक्षांसाठी नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय आरोग्य खात्याच्या नियमांनुसार परीक्षा व्हाव्यत, असेही या पत्रात म्हटले आहे.

यानुसार युजीसीकडून परीक्षा संदर्भात नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांसाठी सूचना करण्यात आली असून यामध्ये सप्टेंबर 2020 अखेरीस परीक्षा घेण्याचे म्हटले आहे. परीक्षेचे माध्यम ऑनलाइन किंवा ऑफलाइन असावे असेही सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी परीक्षा महत्त्वाच्या, असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे यामध्ये म्हटले आहे.
तसेच जे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकणार नाहीत त्यांच्यासाठी विद्यापीठ विशेष परीक्षेचे आयोजन करेल, असे मानव संसाधन विकास मंत्रालयाने म्हटले आहे.