‘फिटनेस क्विन’ दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफचं ‘पॅचअप’ ? पुन्हा झाले एकत्र ‘स्पॉट’

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ आणि फिटनेस क्विन दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरु आहे. दोघांच्या वेगळं होण्याचं कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही. परंतु ब्रेकअपच्या चर्चेने मात्र चाहत्यांना निराश केले हे मात्र नक्की. हैराण करणारी गोष्ट अशी आहे की, ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतानाच टायगर आणि दिशा एकत्र स्पॉट झाले आहेत.

मुंबईत टायगर आणि दिशा हँगआऊट करताना दिसले आहेत. दोघेही एकत्र खूप खुश दिसत आहेत. इतकेच नाही तर, मीडियाचे कॅमेरे पाहिल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. दोघांना पुन्हा एकत्र पाहून चाहते मात्र खुश झाले आहेत. परंतु दोघांच्या नात्याबाबत अजून सस्पेंस मात्र कायम दिसत आहे. तसं पाहिलं तर टायगर-दिशाने मात्र आपलं नातं कधीच स्वीकार केलं नाही. परंतु त्यांच्या फोटोवरून मात्र सर्व काही स्पष्ट होतं.
image (52)

पिंकव्हिलाने दोघांच्याही कॉमन फ्रेंडचा संदर्भ देत लिहिलं होतं की, “गेल्या काही आठवड्यांपासून टायगर आणि दिशाच्या नात्यात काही अडचणी सुरु आहेत. या दोघांनीही आपल्या वाटा ओळखत हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दोघांच्याही बाजूने काही दिवसांपूर्वी झाला होता. टायगर आणि दिशा यांच्यासह त्यांच्या मित्रमंडळींनाही त्यांचे नाते संपणार असल्याची चिन्हे दिसत होती.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, टायगर श्रॉफ काही दिवसांपूर्वीच स्टुडंट ऑफ द इयर २ या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खास काही चालला नाही. बागी सिनेमाचा तिसरा पार्टही अद्याप गुलदस्त्यात आहे. याशिवाय टायगर ऋतिक रोशन सोबतही काम करताना दिसणार आहे. दिशा पाटनी ईदला रिलीज झालेल्या सलमान खानच्या भारत सिनेमात दिसली होती. या सिनेमात दिशा सलमान सोबत रोमान्स करताना दिसून आली.

आरोग्यविषयक वृत्त – 

जाणून घ्या – फिटनेसक्वीन ‘जॅकलीन फर्नांडिस’ची दिनचर्या

भारतातील ब्रँडेड मीठात आढळले सायनाइडसारखे घातक घटक

वजन कमी करण्यासाठी वेगन डाएटला अनेकांची पसंती

रोजची कामं करतानाही तुम्ही बर्न करू शकता कॅलरीज