महिलांना कर्करोग तपासणीचे ‘वाण’, कुंजीरवाडी सरपंचानी ठेवला वेगळा ‘आदर्श’

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – अलिकडे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याने त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सरपंच सुनिता संदीप धुमाळ यांनी शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांची स्तन कर्करोग तपासणी शिबीर निरामई हेल्थ एनालेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. यात थर्मो मॅमोग्राफी ही तपासणी करण्यात आली.

भारतीय नागरिकामध्ये आरोग्याची काळजी घेण्यात थोडा निष्काळजीपणा असतो. महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष न देता कुटुंबातील इतर सदस्याच्या आरोग्याकडे खास लक्ष देतात. परंतु घरातील महत्वाची व्यक्ती म्हणजे गृहिणी होय ती स्वस्थ असेल तर संपूर्ण कुटूंब सुस्थितीत असते म्हणून महिलांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता संदीप धुमाळ यांनी केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी मेहबूब लुकडे प्राथमिक शाळेतील शिक्षिका अंगणवाडी सेविका तसेच इतर शासकीय सेवेतील महिला उपस्थित होत्या.

मकर संक्रांतीस महिला सौभाग्याचे वाण एकमेकींना देऊन शुभेच्छा देतात. परंतु सरपंच सुनिता धुमाळ यांनी यावेळी एक अगळेवेगळे वाण महिलांना दिले. यावर्षी स्तन कर्करोग तपासणी करुन घेतले व वेगळा उपक्रम राबवला.

फेसबुक पेज लाईक करा