Breast Cysts | जाणून घ्या काय आहेत ‘ब्रेस्ट सिस्ट’ची 4 लक्षणे आणि उपचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ब्रेस्ट सिस्ट (Breast Cysts) किंवा स्तनात गाठ येणे आजकाल सामान्य झाले आहे. बहुतेक महिलांना या प्रकारचा त्रास होतो. एका रिपोर्टनुसार, भारतातील 22 पैकी 1 महिला स्तनाच्या कर्करोगाने (Breast Cancer) ग्रस्त आहे आणि त्यामुळे 2 पैकी 1 महिला मृत्यू पावते. स्तनातील गाठीची समस्या (Breast Cysts) प्रामुख्याने तरुणींमध्ये दिसून येते आणि यातील बहुतांश गाठी कर्करोग नसलेल्या असतात (Women’s Health).

 

ब्रेस्ट सिस्टची लक्षणे आणि उपचार काय आहेत ते जाणून घ्या (Symptoms And Treatment Of Breast Cyst)

 

ब्रेस्ट सिस्टची लक्षणे (Symptoms Of Breast Cyst)

1. स्तनात दुखणे – Pain In Breast
स्तनामध्ये गाठ होण्याच्या समस्येचे (Breast Cysts) हे मुख्य लक्षण आहे, ज्यामध्ये स्त्रीच्या स्तनामध्ये गाठ निर्माण होते.

 

2. स्तनात गाठ कायम राहणे – Lump Persistence In Breast
सहसा, स्तनातील गाठ वेळेनुसार स्वतःच बरी होते. हे प्रामुख्याने मासिक पाळीच्या (Menstruation Period) दरम्यान होते, परंतु हे देखील अनेक वेळा दिसून आले आहे की काही महिलांमध्ये मासिक पाळी येऊनही ही गाठ बरी होत नाही.

 

3. रक्तस्त्राव – Bleeding
स्तनाग्रातून रक्त येणे हे स्तनातील गाठीचे लक्षण असू शकते, म्हणूनच योग्य वेळी तपासणी करणे आवश्यक आहे.

 

4. स्तनाच्या आकारात बदल – Change In Breast Size
जेव्हा एखाद्या महिलेच्या स्तनाच्या आकारात अचानक बदल होतो तेव्हा तिने या बदलाकडे दुर्लक्ष करू नये कारण हे स्तनामध्ये गाठ होण्याचे लक्षण असू शकते.

ब्रेस्ट सिस्टचे उपचार (Treatment Of Breast Cysts)

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा (When To Consult A Doctor)
जेव्हा स्तनात गाठ कधीही येऊ लागते, तसेच दुखणे बरे झाले नाही तर या प्रकारची समस्या स्तनाच्या कर्करोगाचे रूपही घेऊ शकते, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ब्रेस्ट सिस्टचा त्रास असलेल्या महिलांनी कॅफीन टाळावे. असे केल्याने महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक धोके कमी होऊ शकतात.

 

रात्री सैल कपडे घाला (Wear Loose Clothes At Night)
स्तनांशी संबंधित समस्या उद्भवू नयेत म्हणून, रात्री सैल कपडे घालणे आवश्यक आहे. कधीही घट्ट कपडे घालून झोपू नका.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Breast Cysts | breast cysts symptoms and causes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pregnancy Inners | प्रेग्नंसी दरम्यान असे असावेत महिलांचे इनरवेअर्स, इन्फेक्शनपासून होईल बचाव; जाणून घ्या

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या प्रमुख शहरातील रेट

 

Ageing Slow Down | ‘एजिंग स्लो डाऊन’ करण्यासाठी ‘या’ 4 फूड हॅबिट्स करा फॉलो, जाणून घ्या सविस्तर