महिलांमध्ये छातीत जास्त दूधाची समस्या का होते ? जाणून घ्या 6 कारणे आणि 4 लक्षणे

पोलिसनामा ऑनलाइन – ब्रेस्ट किंवा स्तनांमध्ये जास्त दूध तयार होणे म्हणजे, बाळ जेवढे दूध पित आहे, त्यापेक्षा जास्त दूध तयार होणे. ज्यामुळे दूध तयार होणे आणि काढणे यामध्ये असंतुलन होते. जास्त दूध तयार झाल्याने मातेचे स्तन सूजतात आणि कठिण होतात आणि त्यामध्ये वेदनासुद्धा होतात. ही सूज वाढून काखेपर्यंत सुद्धा जाऊ शकते. स्तनांमधील नसा दिसू लागतात. या समस्येचे प्रमुख कारण म्हणजे अनेक महिला वेळेपूर्वीच बाळाचे स्तनपान बंद करतात हे आहे. परंतु, डिलिव्हरीच्या 1 किंवा 2 आठवड्यापर्यंत ही समस्या होणे सामान्य आहे.

ही आहेत लक्षणे
1 स्तन सूजणे आणि लाल होणे
2 काहीवेळा दोन्ही स्तनांनी ही समस्या होणे
3 ब्रेस्टचे निप्पल सुद्धा चपटे होतात, ज्यामुळे बाळ व्यवस्थित दूध पिऊ शकत नाही
4 काहीवेळा आईला हलका तापसुद्धा येतो, जो एका दिवसात बरा होतो

ही आहेत कारणे
1 बाळाने अचानक दूध पिणे बंद करणे
2 बाळाने दूध कमी पिणे
3 बाळ झाल्यानंतर उशीरा स्तनपान सुरू करणे
4 बाळाला योग्यप्रमाणात दूध न पाजणे
5 बाळाचे आजारी पडणे
6 स्तन प्रत्यारोपणातही ही समस्या होऊ शकते

असे केले जातात उपचार
बाळाला त्याच्य गरजेनुसार सतत दूध पाजत राहा. जर बाळ निप्पलमधून योग्य पद्धतीने दूध पिऊ शकत नसेल तर, आपल्या हाताने स्तन दाबा आणि दूध काढण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने निप्पल नरम होतील आणि बाळाला सहज दूध पिता येईल. अशा समस्यांमध्ये डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like