नोबेल विजेत्या तज्ज्ञांचा दावा, म्हणाले – ‘तुमच्या श्वासाने तुम्ही कोरोनावर कंट्रोल ठेवू शकता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी सोशल मीडियावरती काय करावं आणि काय नाही याबाबत अनेक सल्ले दिले जातात. तसेच या संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी सर्वात महत्वाची असते ती रोगप्रतिकार शक्ती आणि तिला वाढवण्याकरिता जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देखील दिला जातो. त्यानुसार आहारत बदल करुन विशेष काळजी घेतली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही श्वासोच्छवास कसा करता हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे.

द कनव्हर्सेशन मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात नोबेल विजेता फार्मोकोलॉजिस्ट युइस जे. इगनॅरो यांनी म्हटलं की, नाकावाटे श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडला तर आपल्या शरीरावर हल्ला केलेल्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. १९९८ साली त्यांना फिजिओलॉजी साठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

इनगॅरो यांनी केलेल्या अभ्यासानुसार अशा पद्धतीने श्वास घेतल्याने नाकामध्ये नायट्रिक ऑक्साइड तयार होता. जे फुफ्फुसामध्ये रक्तप्रवाह वाढवतो आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळीही वाढवते. जेव्हा नाकाद्वारे श्वास घेतला जातो तेव्हा नायट्रिक ऑक्साइड थेट फुफ्फुसामध्ये पोहचतो. ज्यामुळे फुफ्फुसामध्ये कोरोना संसर्गाचे प्रतिरुप म्हणजे रिप्लिकेशन होत नाहीत आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते तेव्हा त्या व्यक्तीला खूप फ्रेश वाटतं.