home page top 1

…नाहीतर महापौर आणि आयुक्तांच्या दालनात गडकरींचा पुतळा बसवू : ब्राह्मण महासंघ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशात पुतळ्यांचे राजकारण जास्त गाजत आहे. आता पुण्यात पुतळ्यांचे राजकारण पहावयास मिळण्याची शक्यता आहे. या पुतळ्यांच्या वादात  नाटककार राम गणेश गडकरी यांचे नाव येत आहे. कारण पुण्यातील संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभारण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

‘राजसंन्यासी’ या नाटकातून राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप झाला होता. त्यावरून 3 जानेवारी 2017 च्या मध्यरात्री संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडण्यात आला होता.

पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या पुतळ्यावरुन ब्राह्मण महासंघ पुन्हा अक्रमक झाले आहे. पुणे महानगरपालिकेने दिलेल्या आश्वासनची आठवण करुन देण्यासाठी ब्राह्मण महासंघाने तोडलेल्या स्मारकाची निषेधात्मक पूजा केली. पुतळ्याच्या वादग्रस्त जागेत प्रशासनानं मनाई केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संरक्षक कुंपणाला पुष्पहार अर्पण करुन पूजा केली. गडकरी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं ब्राह्मण महासंघानं पूजा करुन मनपा प्रशासनाचा निषेध केला.

मुख्यमंत्री आणि महानगरपालिका प्रशासन पुतळ्याच्या निर्णयाबाबत टाळाटाळ करत आहे, असा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे. तसंच, राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्यासाठी महासंघ पाठपुरावा करतंय. मात्र त्यांना स्मारक होऊ द्यायचं नसल्याचा आरोप ब्राह्मण महासंघानं केला आहे

दरम्यान, एका महिन्यात पुतळ्याचा निर्णय न झाल्यास महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या दालनात गडकरींचा पुतळा बसवू, असा इशारा ब्राह्मण महासंघानं दिला आहे. तसंच पुतळ्यासाठी मनपा प्रशासनानं कुठंही जागा दिली तर ब्राह्मण महासंघ स्वखर्चाने पुतळा बसवेल, असंही ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितलं.

Loading...
You might also like