‘पृथ्वी शॉ’च्या खेळ कौशल्याची ब्रायन लारालाही भूरळ ; म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या क्रिकेट जगतात एक नाव आपले कतृत्व दाखवत वर येत आहे. हे नाव आहे मुंबईच्या मुलाचे. पृथ्वी शॉ हा सध्या त्याच्या खेळाने सर्वांना भूरळ घालत आहे. त्यामुळे त्याच्या अफाट कौशल्यावर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराही फिदा झाला आहे. ब्रायन लाराने पृथ्वीचे कौतुक केले आहे. मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वीच्या फलंदाजीत वीरेंद्र सेहवागची छटा जाणवते, अशा शब्दांत ब्रायन लाराने स्तुती केली आहे.

पृथ्वीच्या फलंदाजीच्या शैलीत वीरेंद्र सेहवाग बऱ्यापैकी सामावलेला आहे. पृथ्वीची परिपक्वता वाखाणण्याजोगी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना पाहिले होते. एखादा युवा खेळाडू भारतीय खेळपट्टय़ांवर चांगली कामगिरी करत आहे, हे पाहताना मन सुखावले होते, असं लाराने म्हटलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वीला मात्र दुखापतीमुळे खेळण्याची संधी मिळाली नाही. पृथ्वीकडे फक्त दोन आयपीएल मोसमांचा अनुभव गाठीशी असताना तो एखाद्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे आपली कामगिरी चोखपणे पार पाडत आहे, असेही लाराने सांगितले.

आयपीएलमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो आयपीएलमध्ये खेळत आहे, असेच जाणवत आहे. खेळी करण्याची क्षमता असलेला पृथ्वी हा भारतीय संघाचे भवितव्य आहे, असंही लाराने म्हटलं आहे.

दरम्यान, पृथ्वी हा आयपीएलमधील आपल्या खेळाने चाहत्यांना भूरळ तर पाडत आहेच. तसंच त्याच्या कौशल्याने त्याचा वेगळा चाहता वर्ग तयार होताना दिसत आहे.

Loading...
You might also like