ब्रायन लाराच्या पार्टीत टीम इंडियाची ‘मस्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाला वेस्टइंडिज विरुद्ध टी -२० एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर थोडी विश्रांती मिळाली आहे. वेस्टइंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराने आयोजित केलेल्या पार्टीत नुकतीच भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनीही उपस्थिती लावली.

लाराने आयोजित केलेल्या या पार्टीत शुक्रवारी (ता.१६) रोहित शर्मा, के.एल. राहूल, मयांक आगरवाल, रवींद्र जडेजा, शिखर धवन, आणि युजवेंद्र चहल या उपस्थित होते. शिखर धवनने लारासोबतचे सेल्फी सोशल मिडीयावर फोटो शेअर केले आहेत. शिवाय रवींद्र जडेजानेही लारासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. येत्या २२ ऑगस्टला वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्याची कसोटी मालिका सुरु होणार असून कसोटी तज्ज्ञ खेळाडू भारतीय संघात सामील झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –