ब्रायन लाराने घेतली राष्ट्रपती कोविंद यांची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी कॅप्टन ब्रायन लारा सध्या भारतात आहे. ब्रायन लारा सध्या सुरु असेलल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान समालोचक आणि एक्सपर्ट अशा भूमिका पार पाडत आहे. या भारत दौऱ्या दरम्यान ब्रायन लारानं भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. President of India या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून या भेटीबाबत माहिती देण्यात आली आहे. ट्विटवरून कळत आहे की लारानं राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली.

ब्रायन लारा आधुनिक युगातील उत्तम आणि दिग्गज फलंदाज आहे. दरम्यान ब्रायन लाराबाबत बोलताना रामनाथ कोविंद म्हणाले, “उदयोन्मुख खेळाडू आणि क्रिकेटपटूंचा लारा आदर्श आहे. क्रिकेटमधील त्याचं योगदान मोठं आहे.”

जुलै 2019 मध्ये ब्रायन लाराला डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टेरट पदवी मिळाली आहे. नेरूळ मध्ये पार पडलेल्या या पदवीप्रदान समारंभात विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते जुलै 2019 मध्ये ही पदवी देण्यात आली होती. यावेळी लारा म्हणाला होता की, “भारतात मला मिळालेल प्रेम आणि आपुलकीने मी भारावून गेलो. हे प्रेम माझ्या कायमच स्मरणात राहील.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/