वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा मुंबईच्या रूग्णालयात ‘अ‍ॅडमीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेस्ट इंडीजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांना मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ब्रायन लारा यांनी मंगळवारी परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र, ब्रायन लारा यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ब्रायन लारा यांना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तात्काळ डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांच्यावर उपचार सुरु केले. सुत्रांच्या माहितीनुसार, ब्रायन लारा ग्लोबल हॉस्पीटलच्या जवळच एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

सध्या विश्वचषक स्पर्धा सुरु असून या स्पर्धेदरम्यान करण्यात येणारे समालोचन ब्रायन लारा करत आहेत. समालोचन करणाऱ्या टीममध्ये ब्रायन लारा आहेत. वेस्टइंडीजचे दिग्गज ब्रायन लारा ने आपल्या देशाकडून १३१ टेस्ट मॅचमध्ये ११ हजार ९५३ धावा केल्या आहेत. त्यांनी ४०० रनांची सर्वोच्च धाव संख्या करून विश्व रेकॉर्ड बनवले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like