धक्कादायक ! ‘ती’ वस्तू मागितल्याने सासऱ्याकडून सुनेवर गोळीबार

0
15
firing

पटना : वृत्तसंस्था – सासरी जाच होतो म्हणून घर सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर हुंड्यात दिलेला पलंग परत मागितला म्हणून सासऱ्याने चक्क सुनेवरच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत सून जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकऱणी बाबरगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ व्या शतकातही एकीकडे प्रगती करत असताना आपला समाज अजूनही हुंडा प्रथेसारख्या जुनाट प्रथेला चिकटून बसला आहे. हुंडाबळीचे अनेक प्रकार समोर येतात. परंतु बिहारच्या भागलपूरमध्ये हा अजब प्रकार समोर आला आहे.

असा घडला प्रकार

सुर्य शंकर साह यांचा मुलगा भावेश भास्कर यांच्यासोबत जखमी झालेल्या माहिलेचे लग्न झाले होते. दरम्यान लग्नाच्यावेळी हुंड्यात सर्व गोष्टींची पुर्तता करण्यात आली होती. परंतू सासरच्यांकडून त्यासाठी जाच केला जात होता. तिच्यावर आणखी हुंडा आणण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यामुळे महिलेने घर सोडून इतरत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यातर तिने दुसरीकडे राहण्यास सुरुवात केली. रविवारी ती हुंड्यात दिलेला पलंग मागण्यासाठी परत घरी आली. त्यावेळी तिच्यासोबत एक सुतारही होता. त्यामुळे सासऱ्याला राग आला आणि त्यांनी थेट तिच्यावर गोळी झाडली. यात महिला जखमी झाली.