Bribe Case | 10 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचारी ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळयात, जळगाव जिल्हयात खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  वाळू वाहतूक (Sand transport) करणार्‍या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी (Demand of Bribe) करून 10 हजार रूपयांची लाच (Bribe) घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकास (Police Sub Inspector) आणि पोलिस कर्मचार्‍यास (Police Constable) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (Anti Corruption Bureau) रंगेहाथ पकडले आहेत.
अ‍ॅन्टी करप्शनच्या (Anti Corruption) पथकाने गुरूवारी (दि. 10 जून) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे.
पीएसआय (PSI) आणि पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकल्याने जिल्हा पोलिस दलात (In The District Police Force) प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी Police Sub Inspector Sunil Jagannath Vani (56, रा. भिरूड कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ, जि. जळगाव) आणि पोलिस कर्मचारी गणेश महादेव शेळके Police Constable Ganesh Mahadev Shelke (31, रा. पोलिस वसाहत, वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे.
पीएसआय वाणी आणि पोलिस कर्मचारी शेळके हे वरणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
साकेगाव (Sakegaon) येथील एकाने दोघांविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडे (Anti Corruption) तक्रार दाखल केली होती.

…म्हणून लाचेची मागणी

तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू वाहतूक करते.
त्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी उपनिरीक्षक वाणी आणि पोलिस कर्मचारी शेळके यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.
लाच देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी दोघांबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau) तक्रार केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने तक्रारीची पंचासमक्ष खातरजमा केली.
त्यानंतर सापळा रचण्यात आला.
लाच घेताना दोघांना रंगेहाथ (Raid Hand) पकडण्यात आले.
लाच देणार्‍या वाणी आणि शेळके यांच्याविरूध्द वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव अ‍ॅन्टी करप्शनकडून यशस्वी सापळा कारवाई (Successful trap action By Jalgaon Anti Corruption Bureau) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संंजोग बच्छाव, निलेश लोधी, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी दिनेशसिंग पाटील, अशोक अहिरे, सुरेश पाटील, सुनिल पाटील, मनोज जोशी, रविंद्र घुगे, जनार्दन चौधरी, सुनिल शिरसाठ, नासीर देशमुख, प्रविण पाटील, प्रदीप पोळ, ईश्वर धनगर आणि महेश सोमवंशी.
यांच्या पथकाने पोलिस उपनिरीक्षक वाणी आणि पोलिस कर्मचारी शेळकेला लाच घेताना कारवाई केली आहे.
प्रकरणाचा तपास अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी करीत आहेत.

NCP | राष्ट्रवादी काँग्रेसची गरज

Web Title : Bribe Case Sensation in Jalgaon district, anti-corruption bureau arrest police sub-inspector and policeman while accepting bribe of Rs 10,000