५ हजाराची लाच घेताना ‘ती’ महिला क्रिडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – शासकिय योजनेतील अनुदानाच्या २० टक्के रक्कम मागत ५ हजाराची लाच घेताना महिला क्रिडी अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यामुळे क्रिडी क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

त्रिवेणी नत्थुजी बाते (वय ३९) असे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने पकडलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार हे मानकापुर येथील रहिवासी आहेत. त्यांची पारशिवनी येथे महेंद्र बहुद्देशीय संस्था आहे. ते या संस्थेचे सचिव आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे या संस्थेची नोंदणी आहे. दरम्यान त्यांच्या संस्थेला सन २०१८-१९ या काळात युवक कल्याण प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी मंजरी मिळावी यासाठी जिल्हा क्रिडा अधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

क्रिडा अधिकारी त्रिवेणी बाते यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर संस्थेच्या खात्यात २५ हजार रुपयांचे अनुदान जमा केले. त्यानंतर संस्थेच्या लेखा परीक्षणासाटी अनुदान मंजूरीची प्रत मिळावी यासाठी त्यांनी बाते यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अनुदानाच्या २० टक्के रक्कम म्हणून ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याची तक्रार अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाकडे केली. पथकाने याची पडताळणी केली. त्यावेळी त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने मानकापूर येथील कार्यालयात सापळा रचून त्यांन ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

Loading...
You might also like