२००० रुपयांची लाच घेताना म्हाडाचा विभागीय लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- निविदा नामंजूर झाल्याने निविदा रक्कम परत करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्विकारताना म्हाडचा विभागय लेखापाल अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई आज म्हाडाच्या कार्यालयात करण्यात आली.

रशीद हैदर शेख असे अटक करण्यात आलेल्या विभागीय लेखापालाचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदाराने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात निविदा दाखल केली होती. सदरची निविदा नामंजूर झाल्याने निविदेसाठी भरणा केलेली रक्कम परत मिळण्यासाठी शेखकडे गेले होते. मात्र, शेख यांनी २ हजाराची लाच मागितली व लाच न दिल्यास पुढील निविदेचे पैसे अडकवून ठेवण्याची धमकी दिली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून शेखला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.