‘या’ प्रकरणात CBI ने आपल्याच पोलीस उपायुक्त आणि निरीक्षकला केली अटक, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बँकेच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या कंपन्यांविरोधात चौकशीत तडजोड करण्यासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात सीबीआयाने आपल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआयने पोलीस उपायुक्त आर. के. ऋषी, आणि निरीक्षक कपिल धनखड यांच्यासह मनोहर मलिक या वकिलाला अटक केली आहे.

आरोपींन सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.अधिकाऱ्यांनी सांगितले की, सहारनपूर आणि रुडकी येथे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान सीबीआयने यापूर्वी आपल्या चार कर्मच्याऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. तर निरीक्षक कपिल धनखड आणि स्टेनोग्राफर समीर कुमार सिंग यांना निलंबित केले होते.

अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले होते की, प्रशिक्षण विभागातील उपायुक्त आर.के. ऋषी आणि आर के संगवान यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस केली आहे. आठ पानांच्या एफआयआरमध्ये लावण्यात आलेल्या आरोपानुसार निरीक्षक धनखड यांनी सांगवान आणि ऋषी यांच्याकडून लाच घेतली. जे श्रीश्याम पल्प अँड मिल या कंपनीची बाजू मांडत होते. या कंपनीवर 700 कोटींच्या बँक फसवणुकीचा आणि फ्रोस्ट इंटरनॅशनलवर 3600 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा आरोप आहे.

सीबीआयने वकिलावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच श्री श्याम पल्प आणि बोर्ड मिल्सचे अतिरिक्त संचालक मदीप कौर ढिल्लन आणि फ्रॉस्ट इंटरनॅशनलचे संचालक सुजय देसाई आणि उदय देसाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.