लाचखोरीला आळा बसणार ! पुणे पोलीस कॅशलेस होणार, ‘Google Pay’ वरुन भरता येणार दंडाची रक्कम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या corona पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली. परंतु पुणे पोलीस (Pune Police) लाचखोरी करण्यात अव्वल असल्याचा अहवाल एसीबीने जारी केला होता. मागील पाच महिन्यात 23 सापळा कारवाई करण्यात आल्या. परंतु वाहतूक नियमांचे किंवा संचारबंदीचं उल्लंघन केल्यास पोलिसांकडून नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच रोख वसुली केली जाते. अशा लाचखोरीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस (Pune Police) कॅशलेस  करण्यासाठी मोठं पाऊल टाकत आहे.

डिजिटल सुविधा उपलब्ध होणार

येत्या काही दिवसांमध्ये पुणे पोलीस (Pune Police) गुगल पे (Google Pay) द्वारे दंडाची रक्कम भरण्याची डिजिटल (Digital) सुविधा उपलब्ध करुन देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) केल्या जाणाऱ्या लाचखोरीला आळा बसेल. पुणे शहरात (Pune City) जवळपास 96 ठिकाणी नाकाबंदी केली जाते. याठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते. महत्त्वाचे काम असले तरी नागरिकांना जाऊ दिले जात नाही. त्यांना 500 रुपयांची पावती करायला सांगितले जाते.

टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई

नागरिकांनी पैसे नसल्याचे सांगितले तर पोलीस मित्राच्या अकाउंटवर गुगल पे करायला सांगितले जाते.

यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लुट केली जाते.

तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिक योगा’

टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारण नसले तरी पोलीस अगदी किरकोळ कराणांसाठी पावती फाडतात. अशा अनेक तक्रारी विरिष्ठ पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत.

यामुळे पुणे शहर पोलिसांनी (Pune City Police) कॅशलेस होण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस ठाण्यांना स्वतंत्र स्कॅनिंग कोड

नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी एक नवीन व्यवस्था तयार करत आहेत.

पोलिस विभागाचे एक स्वतंत्र खातं काढण्यात येणार आहे.

पुणे पोलीस दलातील 32 पोलीस ठाण्यांच्या नावाने स्वतंत्र स्कॅनिंग कोड दिला जाणार आहे.

2 ते 3 दिवसांत योजना सुरु होईल

स्वतंत्र स्कॅनिंग कोड दिल्यामुळे कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती दंड वसूल झाला ते समजणार आहे.

याची माहिती प्रत्येक दिवशी सायंकाळी समजेल. त्यामुळे नागरिकांना खासगी व्यक्तीच्या नावावर पैसे पाठवावे लागणार नाहीत.

येत्या 2 ते 3 दिवसात ही योजना प्रत्यक्षात येणार आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

 

Also Read This :