तुमचं लग्न ठरलंय ? मग फॉलो करा या ‘ब्रायडल ब्युटी रूटीन, येईल नैसर्गिक ग्लो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास प्रसंग आहे. आपल्या लग्नाच्या दिवशी सर्वांपेक्षा वेगळं आणि स्पेशल दिसावं, असं वाटण साहजिकच आहे. आपण लग्नाच्या पेहरावाप्रमाणे लूक करतो. दरम्यान, लग्नाचे विधी अनेक तास चालतात. यादरम्यान मेकअप टिकून राहणं अवघड आहे. त्यामुळे आपल्या नैसर्गिक सौंदर्यावरही जास्त भर दिला पाहिजे. अश्या ग्लोसाठी लग्नाआधी 5- 6 महिने काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यासाठी जाणून घेऊया काही टिप्स, ज्यांचा फायदा नववधूला खुलून दिसण्यासाठी होऊ शकतो.

स्किन केअर रुटीन :
नियमित काळजी घेतल्याने आपण लग्नाच्या दिवशी सुंदर आणि आकर्षक दिसाल. यासाठी स्कीन केअर रुटीन फॉलो करताना दररोज सकाळी आणि रात्री झोपताना त्वचेला क्लिंझिंग, टोनिंग, मॉश्चराईझ करायला विसरू नये. यासोबतच महिन्यातून एकदा त्वचेला सूट होईल अशी स्कीन ट्रिटमेंट घेणं फायद्याचं ठरेल. त्वचेवर नैसर्गिक उपचार करण्यासाठी मुलतानी माती किंवा चंदन पावडरचा फेसपॅक लावू शकतो. तसेच त्वचा क्लीन करण्यासाठी गुलाबपाणी अथवा कच्चे दूधही वापरता येते. त्वचा मॉश्चराईझ करण्यासाठी बदामाचे तेल, जोजोबा ऑईल, ऑलिव्ह ऑईलचा वापरही करता येतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी दररोज आठ तास पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल.

केसांची काळजी :
लग्नात साखरपुडा, हळदी, फेरे अश्या वेगवेगळ्या विधी असतात. त्यामुळे या विधींनुसार आणि त्या पेहरावानुसार हेअर स्टाईल कराव्या लागतात. यामुळे आपले केस मजबूत आणि दाट असले पाहिजे, ज्यामुळे ते सूट करतील. यासाठी काही महिने आधीपासूनच केसांची काळजी घेण्यास सुरूवात करा. नियमित हेअर ऑयलिंग, स्पा, शॅंम्पू, कंडिश्नर करून तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.

हाता- पायांची निगा
लग्नात हाता- पायांवर मेहंदी काढली जाते. त्यामुळे तेदेखील आकर्षक दिसणे तितकेच गरजेचं आहे. यासाठी नियमित मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करून काळजी घेता येते. तसेच घरगुती पद्धतीने हात-पायांची निगा राखण्यासाठी कोमट पाण्यात मीठ आणि एक-दोन थेंब लव्हेंडर ऑईल टाकून त्यात हात पाय बुडवून ठेवू शकता. तसेच, दररोज रात्री आणि सकाळी हातापायांना मॉश्चराईझर लावून तुम्ही स्कीन केअर घेऊ शकता.