बिहारमध्ये पुराचा हाहाकार ! ड्रमने तयार केलेल्या नावेत बसून वधूला सासरी पाठवलं (व्हिडीओ)

पटणा : बिहारमध्ये सध्या मोठा पूर आला आहे. पावसामुळे पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर पस्थितीचीचे गंमतीशीर पण धोकादायक रूप दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नवविवाहित पती आपल्या नवविवाहित पत्नीला प्लॅस्टिकच्या ड्रमने तयार केलेल्या नावेवर बसवून घेऊन जात आहे. काही लोक या नावेला पुढे ढकलत आहेत. या नावेच्या चारही बाजुंनी भरपूर पाणी आहे. नवविवाहित पती पत्नी या ड्रमच्या नावेवर बसून नदी पार करत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासन जनतेसाठी काय करत आहे? हा प्रश्न जनता उपस्थितीत करत आहे. लोक वेगवेगळ्या साधनांचा वापर करून या पूर परीस्थितीला तोंड देत आहेत.

बिहारच्या उत्तर भागात आणि नेपाळच्या तराई सत्रात झालेल्या मोठ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. यामुळे बिहारमधील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. काही गावांचा तर संपर्क देखील तुटला आहे. जवळपास ६ जिल्ह्यांना या पूर परिस्थितीचा फटका बसला आहे.

नेपाळमधून बिहारमध्ये प्रवेश करणाऱ्या कोसी नदीला दर पावसाळ्यात मोठा पूर येतो. कोसीच्या रौद्र रूपाचा अनेक गावांना फटका बसतो. शनिवारपासून कोसीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. कोसी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या