लग्‍नानंतर माहेरी आलेली विवाहीता बाथरूममध्ये गेली, तिच्या जुन्या प्रियकराने गोळी घालून केला खून

भोपाळ : वृत्तसंस्था – प्रेमामुळे सध्या अनेक धक्कादायक घटना घडत असतात. मध्यप्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील भांडेर या गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकराने आपल्या लग्न झालेल्या प्रेयसीची गोळी घालून हत्या केली आहे. या प्रियकराला पोलीसांनी अटक केली आहे. मात्र घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

भांडेरमधील सिकंदरपूर भागात राहणारी प्रियंका साहू हिचे लग्न २८ मे ला झाले होते. लग्न झाल्यानंतर प्रियंका पहिल्यांदा आपल्या माहेरी आली होती. तिथे रात्रीच्या अडीच वाजता प्रियंका आपल्या आईला सांगून बाथरुममध्ये गेली. तेथे तिचा प्रियकर गोलू आधीच आलेला होता. त्याने प्रियंकावर गोळी झाडली. तिचा जागेवरच मृत्यू झाला.

गोळीच्या आवाजाने तिच्या घरचे बाथरूमकडे पळत आले. तेव्हा त्यांनी गोलूला तेथून पळ काढताना पाहिले. त्यानंतर प्रियंकाच्या घरच्यांनी पोलीसांत धाव घेतली. पोलीसांनी फरार झालेल्या आरोप गोलू यादवला अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने सांगितले की प्रियंका आपल्या नवऱ्याला मारण्याचा कट रचत होती. म्हणून तीनं मला बंदुक घेऊन बोलवलं होते. प्रियंका तिच्या नवऱ्यासोबत रामगढला जाणार होती. तिथं ती तिच्या नवऱ्याला मारणार होती. गोलूने तिच्या या प्लॅनवर जेव्हा नकार दिला त्यावर प्रियंकाने त्यालाच अडकवण्याची धमकी दिली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. यात गोलूने प्रियंकावर गोळी घालून हत्या केली.

दरम्यान, पोलीसांनी कारवाई करत गोलूला अटक केली आहे. तर या हत्येचा अधिक तपास करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

 

Loading...
You might also like