नवरी मुलीचा फोन सतत Busy, म्हणून मोडले लग्न ; नवऱ्या मुलावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नवरी मुलीचा फोन सतत व्यस्त असतो, ती रात्री जास्त वेळ मोबाईलवर ऑनलाईन असते अशी कारणे देऊन चक्क नवरदेवाने लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वधुच्या वडीलांनी खडक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतिश प्रकाश चांदणे (२८, रामटेकडी) याच्याविरोधात नवरी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश चांदणे हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. दरम्यान त्याचा फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्न ठरले. जानेवारी महिन्यात चांदणे याचा साखरपुडा त्यांच्या मुलीशी झाला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी २ लाख ५८ हजार रुपये खर्च करून साखरपुडा करून दिला. त्यानंतर दोघेही मोबाईलवर बोलणे, चॅटींग करू लागले. दरम्यान त्यांचे लग्न ११ एप्रिल रोजी होणार होते. मात्र लग्नाला अवघे १० ते १२ दिवस शिल्लक असतानाच सतिश चांदणे याने लग्नाला नकार दिला. फिर्यादी यांची नवरी मुलगी हीचा फोन सतत व्यस्त असतो. ती रात्री उशीरापर्यंत ऑनलाईन असते. असे कारण देत त्याने लग्नाला नकार देताना सांगितले. असे तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर वधु मुलीच्या वडीलांनी यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ यांनी दिली.