मधुचंद्राच्या रात्री जवळ येण्याच्या वेळी नवरदेव खोकलताना पाहिलं वधूनं, माहेरी पळूनच गेली अन् पुढं…

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनासंदर्भातील अनेक घटना समोर येत आहे. त्यामध्ये काही घटना अशा आहेत कि त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. अशीच एका झारखंडमधून घटना समोर आली आहे. मधुचंद्राच्या रात्री टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत रूममधून बाहेर आलेली नवरी फरार झाली. विशेष म्हणजे याची नवरदेवाला कानोकान खबरही लागली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. या बाबतचे वृत्त एका हिंदी दैनिकाने दिले आहे.

धनबादच्या टुंडीजवळील बेगनोरिया गावात राहणाऱ्या तरूणाचं लग्न बरवाअड्डा पोलीस क्षेत्रातील एका गावातील तरूणीसोबत ३० एप्रिल रोजी झालं होतं. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नवरी नवरदेवासोबत सासरी गेली. दिवसभर सर्व काही ठीक होत. त्यानंतर रात्री ११ वाजता नवरदेव नवरीजवळ बेडरूममध्ये पोहोचला. यावेळी नवरदेव खोकत होता. नवरीला वाटलं की नवऱ्याला कोरोना झाला आहे. ती इतकी घाबरली की तिलाही कोरोनाची लागण होईल असे वाटू लागले. टॉयलेटला जाण्याचं कारण सांगून ती बाहेर आली. आपल्या भावाला फोन करून सर्व काही सांगितले. भाऊही तिला घेण्यासाठी तिच्या सासरी पोहोचला. विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना कोणालाही कानोकान खबर नव्हती.

नवरदेव नवरीची आतुरतेने वाट बघत राहिला. जेव्हा बराच वेळ होऊनही नवरी परतली नाही तर नवरदेवाला शंका आली आणि त्याने नवरीचा शोध सुरू केला. पण ती मिळून येत नव्हती. त्यानंतर नवदेवाने तिच्या माहेरी फोन केला असता हा प्रकार समोर आला. नवरदेवाच्या घरातील लोकांना ताप होता.त्यामुळे त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. दरम्यान, जर आम्ही लोक कोरोना संक्रमित निघालो तर जवळच्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल असं सासरच्या लोकांमधील एकाने गमतीने नवरीला सांगितले. त्यामुळे नवरी घाबरली होती. मात्र, आता एखादा शुभ मुहूर्त पाहून नवरीची पुन्हा पाठवणी केली जाणार असल्याचे समजते.