Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान लग्न करणं पडलं महागात, ‘वधू-वरा’सह 20 वर्‍हाडींवर FIR दाखल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  लोकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी आणि कोरोना व्हायरससारख्या भयंकर आजारापासून बचाव करण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे सरकारने लग्ने, मेजवानी, मेळाव्यासारख्या गोष्टींवरही बंदी घातली आहे. एवढे करूनही लोक ऐकायला तयार नाहीत. अशाच एका प्रकरणात, पोलिसांनी गुरदासपूरहून परतत असलेल्या व्हराडाला रस्त्यातच थांबवून वर-वधू तसेच 20 जनावर गुन्हा दाखल केला आहे.

लॉकडाऊन दरम्यान लग्न करून परतत असताना टांडा पोलिसांनी व्हराड थांबविले. हे व्हराड गुरदासपूरहून लुधियानामार्गे होशियारपूरकडे जात असल्याचे समजते. त्यावेळी वराबरोबर वराची कार परत येत होती. त्याच्यासोबत आणखी पाच वाहनांचा ताफाही होता. ज्यात इतर 20 लोक होते. देशात कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याने होशियारपूरचे टांडा पोलिस सर्वत्र पहारा देत आहेत. पोलिसांनी वधू-वर आणि त्यांचा ताफा येत असता त्यांना वाटेतच रोखले. यानंतर पोलिसांनी वधू- वरासोबत 20 जणांवर सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, व्हराडात सामील झालेल्या सर्व मंडळी आणि नवविवाहित जोडप्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचीही चौकशी केली जाईल.

दरम्यान, लॉकडाऊन दरम्यान कोणालाही येण्या- जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, सर्व सामूहिक कार्यक्रम बंद केले गेले आहेत. प्रशासनानेही विवाह सोहळा थांबविला आहे. संपूर्ण परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. असे असूनही लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत.