‘त्या’ नवरीनं तिघांना लुटलं ! एकाला 1 कोटी, दुसर्‍या 45 लाखांचा लावला चुना तर तिसर्‍यासोबत गेली अमेरिकेला

पोलिसनामा ऑनलाईन :  वेगवेगळ्या माध्यमातून महिला आणि मुलींची फसवणूक झाल्याचे आपणास ऐकिवात आहात. मात्र, एका मुलीनेच विवाहच्या माध्यमातून तिघांना लुटल्याची घटना समोर आली आहे. झारखंडच्या चतरा इथली हि घटना असून इथल्या इटखोरी येथे राहणार्‍या प्रियंका कुमारीवर ‘शादी डॉट कॉम’च्या माध्यमाने तिघांना लुटल्याचा आणि परदेशात पळून गेलीय. ‘शादी डॉट कॉम’च्या माध्यमातून तिने एकाला 1 कोटी तर, दुसर्‍या 45 लाखांचा चुना लावलाय.

याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रियंकाने वेगवेगळ्या राज्यांतील युवकांना जाळ्यात ओढून त्यांना लाखो रुपयांचा चुना लावलाय.

प्रियंका ‘शादी डॉट कॉम’च्या माध्यमातून सर्वप्रथम गिरिडीहच्या निलय कुमार नामक या तरुणाच्या संपर्कात आली. यानंतर त्याच्यासोबत रांची इथे लग्न केले. दोन वर्षांनंतर निलय आणि प्रियंका यांच्यात भांडण होऊ लागले. यावेळी प्रियंका निलयकडून एक कोटी रुपये लुटून गायब झाली.

काही दिवसांनंतर प्रियंकाने पुन्हा ‘शादी डॉट कॉम’वर स्वतःला अविवाहित दाखवून गुजरातमधील राजकोट इथल्या अमित मोदी या युवकाशी लग्न करून त्याच्यासोबत राहू लागली. यावेळी तिने कुटुंबात आर्थिक अडचण असल्याचे सांगितले. आणि अमित यांच्याकडून सुमारे 40 ते 45 लाख रुपये घेऊन ती पळाली.

अमित मोदीसोबत काही महिने राहिली. त्यानंतर प्रियंकाने अमितला सांगितले की, तिच्या बहिणीला दिल्लीला शिफ्ट करायचे आहे. यासाठी तिला दिल्ली इथे जात आहे. यानंतर प्रियंका दिल्लीला जाण्याचे सांगून घरातून बाहेर पडली, ती परतलीच नाही.

अमितला कालांतराने समजले की 29 डिसेंबर 2018 रोजी प्रियंकाने पुण्यातील सुमित दशरथ पवार या तरुणाशी लग्न केलंय. तसेच प्रियंका त्याच्यासोबत अमेरिका (कॅलिफोर्निया) येथे गेलीय. सुमितच्या आईने जेव्हा प्रियंकाच्या मोबाईलवर अमितचा कॉल पाहिला. अमितसोबत प्रियंकाचे फोटो पाहिले. तेव्हा तिचा भांडाफोड झाला.

सुमितच्या आईने अमितला फोन केला आणि प्रियंकासंदर्भात चौकशी केली. यानंतर सत्य समोर आले. यानंतर त्यांनी पुणे पुलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार याची चौकशी सुरु झाली.

यातून प्रियंकाचे धागे राजकोट आणि चतरा जिल्ह्यात आढळले. इटखोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन दास यांनी सांगितले की, पुणे पोलिसांनी याप्रकरणी चतरा पोलिसांना चौकशी करायला सांगितले आहे. याशिवाय पासपोर्ट ऑफिसला चुकीची माहिती दिल्याचा आरोपही प्रियंकावर केला असून त्याचीही चौकशी सुरू आहे.