…. म्हणून नवरीने चक्क लग्नाला दिला नकार, दारी आलेली वरात पाठवली परत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुहूर्तमेढ रोवली होती…हळदी लागल्या होत्या…आदल्या रात्री मेहंदीचा कार्यक्रम झाला होता. दुस-या दिवशी विवाहाचा मुहूर्त होता. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. नव-या मुलाची वरात दारी आली होती. इतक्यात मुलाकडून दागिने न मिळाल्याने नवरीने चक्क लग्नास नकार दिला. त्यामुळे वरात नवरीविनाच माघारी परतली. यामुळे सर्वांच्या आनंदावर विरजण पडले.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील पट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. नवरदेवाने दागिने दिले नाहीत, म्हणून नवरीने चक्क लग्नास नकार दिला. इतक्यावरच हे प्रकरण थांबले नाही. नंतर बोलवण्यात आलेल्या पंचायतमध्ये नवरदेवाकडील लोकांना लग्नाच्या जेवणासाठीच्या खर्चातील अर्धा खर्चही द्यावा लागला. ही वरात सुल्तानपूरच्या मीरपूर क्षेत्रातील प्रतापूर येथून आली होती. वरातीमध्ये आलेल्या लोकांनी जेवणही केलं. यानंतर नवरदेवाकडून आणलेल लग्नासाठीच साहित्य नवरीच्या घरी पाठवण्यात आले. इथेच सगळा गोंधळा झाला. मात्र, त्यात केवळ एकच दागिना होता. यावरूनच नवरीकडील मंडळी नाराज झाली. मग काय दोन्हीकडील मंडळीमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की, नवरीने समोर येत लग्नाला नकार दिला. त्यामुळे नवरदेवाला नवरीविनाच रिकाम्या हाताने परतावे लागले.