Bride Wear Pantsuit : वधूनं लग्नात घातला अद्याप कधीच न पाहिलेला असा आगळा-वेगळा ड्रेस ! ट्रोल झाल्यावर म्हणाली… (फोटो)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लग्न म्हटलं की, वधूसाठी लेहंगा पाहिला जातो. प्रत्येक बारीक गोष्टींवर नजर ठेवली जाते. रंग डिझाईन सारं काही पाहिलं जातं. परंतु एका मुलीनं मात्र हटके काही काम केलं आहे ज्यामुळं आता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

संजना ऋषी असं या मुलीचं नाव आहे. अलीकडेच ती विवाहबद्ध झाली आहे. तिच्या लग्नाची खास बात अशी की, तिनं तिच्या लग्नात पँटसूट घातला होता. संजनाचे हे फोटो समोर आल्यानंतर आता सोशलवर त्यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पँटसूट आणि डोक्यावर दुपट्टा घेतला होता. सोबत तिनं काही ज्वेलरीही कॅरी केली होती. तिचे फोटो समोर आल्यानंतर काहींनी तिला ट्रोलही केलं.

परंतु एक पोस्ट शेअर करत तिनं यावर भाष्य केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये संजना म्हणते, लोक तिच्यावर काही विचित्र कमेंट करत आहेत. कोणी तिला क्रेझी ब्राईड म्हणत आहे तर कुणी गरीब. परंतु तिला ट्रोलर्सच्या कमेंटनं काहीच फरकत पडत नाही.

असं असलं तरी काही लोक असेही आहेत ज्यांना संजनाचा हा लुक आवडला देखील आहे. काहींनी तिला लग्नसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

संजनाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार अनेकांना खूप आवडला आहे. खूप नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.