लग्नापुर्वी मुली करू लागल्यात ‘सिक्रेट सर्जरी’, व्यवसायात कोट्यावधीची ‘उलाढाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुलींसाठी आजकाल एक नवीन चिंता वाढताना दिसत आहे. लग्नानंतर पहिल्या रात्री त्यांच्यावर व्हर्जिन असल्याचं दाखवण्यासाठीचा दबाव असतो. यासाठी जगात अनेक मुली सिक्रेट सर्जरी(व्हर्जिनिटी रिपेअर सर्जरी) करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या देशात या सर्जरीची किंमत वेगळी आहे. जर तुमची मागणी खास असेल तर यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. भारतात हा खर्च 15 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे. परेदशांमध्ये हा खर्च 2.75 लाख असू शकतो.

ब्रिटन, फिलीपाईन्स आणि जगातील इतर अनेक देशात व्हर्जनिटी रिगेन सर्जरीच्या(व्हर्जिनिटी रिपेअर सर्जरी) मदतीने डॉक्टर लाखो रुपये कमावताना दिसत आहेत. लंडनमध्ये याबाबत खुलासा झाला आहे. जिथे 22 असे सिक्रेट क्लिनिक मिळाले आहेत. 30 ते 40 मिनिटांसाठीच्या या सर्जरीसाठी भारतात 15 ते 60 हजार रुपये घेतात तर युरोपीय देशांमध्ये 2.50 लाखांपासून 2.75 लाखांपर्यंत पैसे घेतात. पारंपरिक विचार आणि सामाजिक दबावामुळे मुली असं करत आहेत.

या ऑपरेशनमध्ये प्रायव्हेट पार्टच्या एन्ट्रीला त्वचा पडदा(हायमेन) निर्माण केला जातो. या कृत्रिम हायमेनला कौमार्याचं टोकन मानलं जातं. अनेकदा मुलगी लग्नाआधी व्हर्जिन नाही या एका कारणामुळे लग्न मोडण्याच्या घटना होतात. असं ऑपरेशन करणाऱ्या तरुणींमध्ये मध्य, पूर्व आणि आशियाई कुटुंब आहेत. ज्या लग्नाच्या दाबावात असं पाऊल टाकतात. डॉक्टर मात्र लाखोंची कमाई करत आहेत.

अलीकडेच एका सौदी अरबियाच्या शालेय मुलीने आपला 18 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर लंडनमध्ये व्हर्जिनिटी रिपेअर सर्जरी केली. यासाठी तिने जवळपास 1.50 लाख रुपये दिले.

लंडनमधील एमएएस गायनॅकोलॉजीचे डायरेक्टर मोहम्मद मसूद सांगतात, “गेल्या 6 वर्षात व्हर्जिनिटी रिपेअरच्या सर्जरीत चार पटीने वाढ झाली आहे. याची आकडेवारी आम्ही ठेवत नाही कारण अशी सर्जरी करणाऱ्यांना आपली खासगी माहिती गुप्त ठेवायची असते. आमच्याकडे जास्त करून मुस्लिम, रोमा समुदाय आणि भारतासहित पूर्ण आशियातून लोक येतात.”

दोन वर्षांपूर्वीचे मीडीया रिपोर्ट्स सांगतात की, भारतात लोक कौमार्यासाठी डिझायनर सर्जरी करत आहेत. यात क्लिटोरल हुड रिडक्शन, लेबियाप्लास्टीस, व्हजायना टायटनिंग यांसारख्या अनेक सर्जरी असतात. अनेक महिला बार्बी लुक सर्जरी करतात. याचा अर्थ एकदम नवीन व्हजायना.

अमेरिकन सोसायटी फॉर अ‍ॅस्थेटीक प्लास्टिक सर्जरीनुसार, 2016 मध्ये 18 वर्ष आणि त्याहून कमी वयाच्या 400 हून अधिक मुलींनी सिक्रेट सर्जरी फक्त अमेरिकेतून केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like