मुंबई महापालिकेत विविध पदांच्या 150 जागांवर भरती, जाणून घ्या

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – बृहन्मुंबई महानगर पालिकेअंतर्गत मुंबई येथे विविध पदांवर 150 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज ई – मेल करावे लागेल. हे अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2020 असेल.

पद आणि पदांची संख्या –
1. कनिष्ठ वकील – 75 जागा
2. वरिष्ठ वकील – 75 जागा

पात्रता –
– कनिष्ठ वकील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एलएलबी पूर्ण केलेले असावे. तसेच त्यांच्याकडे 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा.
– वरिष्ठ वकील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एलएलबी पूर्ण केलेले असावे, तसेच त्यांच्याकडे 15 वर्षांचा अनुभव असावा.

शुल्क –
उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरीसाठी जावे लागेल.

ई-मेल आयडीद्वारे अर्ज –
[email protected] या ईमेल आयडीवर उमेदवार अंतिम तारखेपूर्वी अर्ज करु शकतात.
www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटवर जाऊन उमेदवार अधिक माहिती देखील मिळवू शकतात.