Coronavirus : BMC कडून 381 परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित, भाजीपाल्याची विक्री रस्त्यावर बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोना विषाणूचा सर्वाधिक महाराष्ट्रात भडका उडाला आहे. राज्यात साथीच्या रुग्णांची संख्या १,२०० च्या वर गेली आहे, जी इतर कोणत्याही राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता उद्धव ठाकरे सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत. ताज्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने राज्यात 381 अशी ठिकाणे शोधली आहेत जिथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. बीएमसीने आता सर्व 381 क्षेत्रे ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित केली आहेत.

महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह घटनांची संख्या वाढून १,२०० झाली आहे, तर ७२ लोकांचा मृत्यूही झाला आहे. महानगरपालिकेने आता वाढत्या सर्व संभाव्य घटनांवर मात करण्यासाठी कडक कारवाई केली आहे. ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित केलेल्या ठिकाणी भाजीपाला, फळबाजार, फेरीवाले आणि विक्रेते यांच्यावरही बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, यादरम्यान, मेडिकल स्टोअर उघडण्यासाठी सूट देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हंटले आहे की, साथीच्या आजारांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडणाऱ्यांवर मुंबई पोलिस कडक कारवाई करीत आहेत. बुधवारी लॉकडाउन उल्लंघन करणार्‍यांविरोधात आयपीसीच्या कलम १88 अन्वये ४६४ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. 20 मार्चपासून उल्लंघन करणार्‍यांवर 3,634 गुन्हे दाखल आहेत. कालपर्यंत, 2,850 लोकांना अटक करण्यात आली आणि जामिनावर सोडण्यात आले.

BMC 1 लाख रॅपिड टेस्ट किट खरेदी करणार

दरम्यान, असेही वृत्त आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका कोविड -१९ चाचणी घेण्यासाठी दक्षिण कोरियाकडून १ लाख रॅपिड टेस्ट किट खरेदी करणार आहे. बीएमसीची रॅपिड टेस्ट सुरू करण्याची योजना आहे. यासाठी दक्षिण कोरियाकडून एक लाख टेस्टिंग किट मागवण्यात आले आहेत. दक्षिण कोरियाप्रमाणेच बीएमसीही रँडम सॅम्पलिंग घेण्याची तयारी करत आहे. या प्रक्रियेद्वारे अधिकाधिक लोकांची चौकशी केली जाऊ शकते. जी संसर्ग रोखण्यासाठी महतवाचे पॉल ठरेल. तसेच आता मुंबईत सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.